राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. बंड करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या एकनाथ शिंदेंनी आणखी धक्के देणं सुरूच ठेवलं आहे. आता ठाकरे सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी मागे घ्यायची मागणी करत शिंदेंनी आणखी एक धक्का दिला आहे.